Sunday, March 20, 2011

काही जागतिक सत्ये

१ . ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळ घेतो!

१ ) पेन: दुसरयाकडून घेवून परत न करण्याची वस्तू
२) बाग: भेळ शेवपूरी वगॆरे खाऊन कचरा टाकण्याची जागा
३) चवकशीची खिडकी: 'इथला माणूस कोठे भेटेल हो' अशी चवकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक चवकोनी जागा.
४)ग्रंथपाल: वाचकाने मागितलेले पुस्तक 'बाहेर गेले आहे' असे तंबाखू चघळत तिराकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.
५) विद्यार्थी: आपल्या शिक्शकांना काहीही dyaan नाही असे मानून आत्मकेंद्रीत राहणारा एक जीव
६) कार्यालय: घरगुती ताणतणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा
७) जांभई: विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी
८) शब्दकोश: जिथे 'लग्ना'आधी 'घटस्फोट' होतो असे स्थ्ळ
९) प्रेमप्रकरण: क्रिकेट सारखाच एक खेळ. जिथे पाच दिवसांच्या 'कसोटी'पेक्शा झटपट 'सामने' अधिक लोकप्रिय असतात
१०) सिगारेट: वाळका पाला भरलेली एक सुर नळी जिच्या एका टोकाला आग दुसरया टोकाला मुर्ख माणूस
११) कपबशी: नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू

१२) कॉलेज : शाळा व लग्न यामधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण





No comments:

Post a Comment