Thursday, September 16, 2010

बायको म्हणजे,,,,,,,,,

हि कविता जरी तमाम बायको वर्गाची असली तरी,,,,
तमाम नवरे वर्गालाही हि कुठे तरी पटणारी आहे ,,,

बायको म्हणजे बायको असते
कधी मंद दिव्याची वाट तर कधी पेटलेली मशाल असते ,
ती जेव्हा घरात असते ,माझ तिच्याशी पटत नाही,
जेव्हा ती घरात नसते तेव्हा जरा सुध्दा करमत नाही
पाणी, धोबी, दुधवाला, पेपरवाला, नाठाळ शेजार्याला ,
ती व्यवस्थित हाताळते ,,,,,,
पासबुक, लॉकरच्या चाव्या, हात रुमाल,
घरात कुणाची वस्तू कुठे आहे ,
कुणाचा वाढदिवस कधी आहे,
सारी नोंद तिच्या मेंदूत फिट्ट असते .
आला गेला, पै पाहुणा , सर्वांच ती मनापासून स्वागत करते ,
कोण आचरट  , कोण हावरट, कोण बावळत ,कोण भला,
प्रत्येकाची नवी ओळख तीच करून देते
मुलाच अभ्यास ,गृहपाठ,पालकसभा,तीच अटेंड करते
विविध कर्ज ,कशाकशाचे हप्ते ,सणवार,लग्नकार्य,
देणीघेणी,
एकाच वेळी अनेक आघाड्यांवर ती लढत असते 
सासू सासरे ,आई वडील,दीर जावू, नणंदा आणि वहिनी
सर्वांशी गोड बोलून चांगुल पण मी घेतो .
नको तिथे नको तेव्हड खर बोलून
वाईट पणा ती घेते,
घराच्या दारावर नेम प्लेट माझी असते
पण आत तिच्याच ईशार्यावर अवघ घरदार नाचत असते
फुटक माझ नशीब मेलं
चांगली स्थळ सोडून मी तुमच्या घरी आले
केवळ मी म्हणून हे सार सोसलं 
आजवर येथे टिकून राहिले
अधून मधून हे धृवपद ती सारख आळवत असते
तुमची काय माझी काय ,,,,,
प्रत्येकाची बायको हेच म्हणत असते
दोन्ही हातानी मी पैसे उधळत असतो
ती मात्र काटेकोर हिशेब ठेवत असते
कधी श्रावण सारी सारखी ती प्रसन्नपणे बरसत असते 
तर कधी ग्रीष्मातल्या उन्हा सारखी प्रसन्नपणे  तळपत असते
तीच बरसण तीच तळपण
सर्वांच्या सुखासाठीच
अवघ्या घरादारासाठी ती कणाकणाने झिझत असते   

 

3 comments:

  1. Facebook
    to me

    show details 12:50 AM (3 minutes ago)

    Monalisa Jadhav commented on your link.

    Monalisa wrote:
    "nice ! i like ur wallpost ! keep it up ! मनापासून शुभेच्छा !"


    Reply to this email to comment on this link.

    To see the comment thread, follow the link below:
    http://www.facebook.com/n/?profile.php&id=100001161010917&v=wall&story_fbid=128504603865722&mid=2fc6b3aG5af3422096d9G33ec8eGe&n_m=suprabhu12%40gmail.com

    ReplyDelete
  2. Prashant Koli commented on your link.

    Prashant wrote:
    "kihup chhan aahe"


    Reply to this email to comment on this link.

    To see the comment thread, follow the link below:
    http://www.facebook.com/n/?profile.php&id=100001161010917&v=wall&story_fbid=128504603865722&mid=2fd1319G5af3422096d9G33ec8eGe&n_m=suprabhu12%40gmail.com

    ReplyDelete
  3. Facebook
    to me

    show details 11:25 AM (11 hours ago)

    Sachin D. Redekar commented on your link.

    Sachin wrote:
    "Really a great Poem."


    Reply to this email to comment on this link.

    To see the comment thread, follow the link below:
    http://www.facebook.com/n/?profile.php&id=100001161010917&v=wall&story_fbid=128504603865722&mid=2fcfff6G5af3422096d9G33ec8eGe&n_m=suprabhu12%40gmail.com

    ReplyDelete