Friday, August 17, 2012

देवा रवळनाथा

वाडीच्या पोष्टात एक पत्र येता, सॉरटिंग करताना पोस्टमन पत्तो बघता तर "श्री देव रवळनाथ, मु.पो. स्वर्ग" सगळे हसतत, गंमत म्हणान पोस्टमन पुढचा वाचता
"देवा रवळनाथा, बाबीच्या आयेचो नमस्कार. 
बाबी बायलेक घेवन मुंबैक गेलो तेवा पासून एक पैसो पाठवल्यान नाय तीन म्हयन्यात, 
माझी अगदीच इटमणा झाली रे देवा, माझ्या पोटा पाणयाचा काय करू? गेले दोन दिवस नुसती पेज आणि तोराची चटणी खावन काढलंय. 
काल मिरगाच्यादिवसाक सगळी कोंबडी सुदा चोरयेक गेली. 
काळू गाय लोकाचो तरवो खावन आपलो दिवस काढता. 
पण असा आणि किती दिवस चलताला? 
तेवा कायतरी सोय कर लवकर. वाट बगतंय."
सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येता. पोष्टाचे लोक कदी नाय ती सोमती वरगणी काढतत. 
९० रुपये जमा जातत. पोस्टमन बाबीच्या आयेक नेवन दिता. 
रवळनाथ पावलो आणि सोमती मनीऑर्डर केल्यान बाबीच्या आयेक वायचं बारा दिसता. 
दोन दिवसांनी परत बाबीच्या आयेचा एक पत्र पोष्टात येता.
पोस्टमन वाचूक सुरवात करता
"देवा रवळनाथा, पावलस रे बाबा अडीअडचणीक, 
पैशे पोचले. पण माझी एक तक्रार आसा. 
माका म्हायती आसा तू १०० रुपये पाठवल आसतंलस ते. 
पण पोष्टातल्या लोकांनी माका ९० रुपयेच दिले आणि १० आपण खाल्यानी. चोर मेले. वाटोळा कर मेल्यांचा."

Friday, August 3, 2012

मला पडलेले काही प्रश्न

१. मानुस जर माकडापासुन उत्क्रांत झाला असेल तर आजही माकडे कशी आहेत?

२. अनुभवी डौक्टर ही कुठेतरी "प्रॅक्टीस" कसे करतात?

३. शेंगदाणा तेल - शेंगदाण्यापासुन, सुर्यफुल तेल - सुर्यफुलापासुन तर मग "बेबी - ओईल" कशापासुन बनवतात?

४. बरीच "कामे जुळवणा-याला" - ब्रोकर का म्हणतात?

५. "फ्रेंच किस"ला फ्रान्स मध्ये काय म्हणतात?

६. बांधकाम पुर्ण झालेल्या ईमारतीलाही "बिल्डींग" का म्हणतात?

७. प्रकाशाचा वेग माहिती आहे.... अंधाराचा किती असतो?

८. गोल पिझ्झा नेहमीच चौकोनी पॅकमध्ये का पाठवतात?

९. जंगल मॅन टारझन ला दाढी कशी काय नव्हती?....

१०. "फ्री गिफ्ट" म्हणजे काय? गिफ्ट फ्रीच असतात ना?

११. ५ मधील ४ लोक डायरियाने त्रस्त आहेत .... म्हणजे ५ वा डायरियाचा आनंद घेतोय काय?........

१२. जर आपला जन्म ईतरांची मदत करण्यासाठी झाला असेल तर ईतर लोक कशासाठी जन्मलेत?

१३. "पार्टी" संपल्यानंतर येखादीतरी मुलगी रडताना का दिसते?............

१४. कंप्युटर बंद करण्यासाठी "स्टार्ट" वर का क्लिक करावे लागते?

१५. २१ - ट्वेंटी वन , ३१ - थर्टी - वन मग, ११ - वन्टी वन का नाही?.............

PLZ ans. Me.....