Wednesday, September 12, 2018

*वजन कमी करण्यासाठी मोहरी (राई)*

 पुरातन काळापासून आपल्या भारतीय संस्कृतींत *मोहरी (राई)* ला अतिशय महत्व आहे. अनेक आजारांवर रामबाण उपाय असलेली *मोहरी (राई)* विषयी नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून हे सिध्द झाले आहे की वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा, सरळ, कोणतेही साईड इफेक्ट नसलेला उपचार म्हणजे *मोहरी (राई)* .
उपचार पध्धत खालील प्रमाणे आहे:
*जिन्नस*:
एक किलो उत्तम दर्जाची *मोहरी (राई)*
एक स्टिल किंवा काचेचे पात्र ( ज्या मध्ये एक किलो मोहरी राहू शकेल)
एक लिटर पाणी
१० फुट बाय १० फुट रिकामी जागा

पध्धत:
मोहरी(राई) भरेलेल पात्र उजव्या हातात घ्या व १० फुट बाय १० फुट रिकाम्या जागेत सर्व मोहरी(राई) भिरकवा / पसरवा.
दोन पावलं एकमेकांपासून साधारण १ ते २ फूट दूर ठेवा आणि मग कमरेतून वाकून
मोहरी(राई) चा एक एक दाणा जमिनीवरून उचलून भांड्यात टाका. काम पूर्ण झाल्यावरच भांड्याचे वजन करा. भांड्यातील मोहरीचे(राईचे) वजन तेव्हढेच आढळल्यास खात्रीशिर पणे सांगू इच्छितो की तुमचे वजन नक्की तिप्पटीने कमी झाले असेल.
वरील प्रकार केल्याने दुसरे कोणतेही उपासतापास, कोणत्याही पावडरी घेण्याची जरूर नाही. बांधा सुडौल होईल व एकदम ताजेतवाने वाटेल.

ता.क.:
👉१ लिटर पाणी चक्कर वगैरे आल्यास पिण्या साठी आहे.

👉झिरो फिगर त्वरीत करायची असल्यास मोहरी(राई) ऐवजी खसखस वापरा.

पुणेकर आयुर्वेदाचार्य
स्वामी सुनीलानंद🤑🤑

No comments:

Post a Comment