Tuesday, August 31, 2010

सुंदर तरुणी दिसल्यावर...

कळे न मजला इतके भीषण काय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!
तशी तिची अन माझी ओळख नव्हती तरिही
तशी बायको सोबत माझी होती तरिही
नकळत माझ्या छातीमध्ये कळ आली अन
तिला केशरी बासुंदीची साय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!
नकळत जे ओठांवर आले, कसे आवरू?
चुकून मी पत्नीस म्हणालो 'पहा पाखरू'
तिला पाखरू म्हटलो ते म्हटलोच आणि मी
'तिच्यापुढे तू अगदीच गोगलगाय' म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!
तिला पाहुनी जरी बायको 'अहा' म्हणाली
चला घरी मग तुम्हा दावते, पहा म्हणाली
घडायचे जे घरात, डोळ्यासमोर आले...
(दिसेल माझे नशीब दुसरे काय? म्हणालो!)
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!
हाय ऐकुनी तरुणी तर ती हसून गेली
मला पाहण्या पत्नी कंबर कसून गेली!
धावत मी पत्नीच्या मागे जाता जाता...
परिणामांना मी डरतो की काय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!
जरी तिला बोलांचा माझ्या तिटकाराही
मला आवडे तिचा असा हा फणकाराही
चिडल्यावरती नेहमीच ती सुंदर दिसते!
म्हणून तर भलत्या तरुणीला हाय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

ज्या ज्या वयात जे जे करायचं

ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं!
लहानपणी... फुलपाखरांच्या मागे धावायचं
तरुण वयात 'पाखरां'च्या मागे धावायचं
प्रौढ वयात कुटुंबासाठी धाव धाव धावायचं
म्हातारपणी देवाचं नाव घेत गप पडून रहायचं...
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं!
लहानपणी ऊन वारा पावसामधे मनमुराद बागडायचं
तरुणपणी प्रत्येक श्वासात मोगरा घेऊन जगायचं
प्रौढ वयात आपल्या भोवती नंदनवन फुलवायचं
म्हातारपणी त्याच बागेत निवृत्त मनानं रमायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं!
लहानपणी खेळातलं भांडण जिथल्या तिथे मिटवायचं
तरुणपणी मोर्चे न्यायचे, आंदोलनसुध्दा करायचं
प्रौढ झाल्यावर आपल्या तक्रारींची मुळं शोधत रहायचं
उतारवयात साऱ्या मुळांना गीतेत बुडवून टाकायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं!
तरीही काही गोष्टी प्रत्येक वयात जमायला हव्यात
पहिल्या पावसाच्या पहिल्या धारा अंगावरती झेलायला हव्यात!
वाऱ्यासोबत पिसासारखं हलकं होता यायला हवं
गडगडणाऱ्या मेघासारखं बोलकं होता यायला हवं
अंधाराच्या गर्भामधे ज्योत ठेवता यायला हवी
एकटं खूप वाटतं तेंव्हा गाणी म्हणता यायला हवी!
कुठल्याही वयात आपला आनंद आपणच शोधत रहायचं...
तरीही...
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं!

Monday, August 30, 2010

Symbol interpretation...

Monday, August 23, 2010

हिंदी लेटर











































Can u guess which upcoming festival is this????????



































! 
!
 
!
!
!
 
!
 
!
!
!
!
 
!
!
!
 
!
 
!
!
!
 
!
 
!
!



You might have said: Krishna Janmastmi
(Dahi Handi) .



****** 
Wrong***** 



Scroll down for answer
 


!
 
!
 
!
!
!
 
!
 
!
!
!
!
 
!
!
!
 
!
 
!
!
!
 
!
 
!
!
!
 
!

!
!
!
 
!
 
!

!
 


"
 RAKSHA BHANDHAN

Friday, August 13, 2010

बायको नावाचं वादळ

तुम्ही घरात शिरता तेंव्हा
सारं शांत शांत असतं
चपला जागेवर, पेपर टिपॉयवर
सारं जागच्या जागी असतं
सोफ्यावरती बसून राहून
हातामधे रिमोट घेऊन
बायको नावाचं वादळ
तुमची वाट बघत बसलं असतं!
तुम्ही खुर्चीवर बसता क्षणी
हातात चहाचा कप येतो
'दमलो बुवा' या वाक्याला
पलिकडुन नुसता हुंकार येतो
टी व्ही मधल्या शून्यात बघत
चहा संपायची वाट बघत
बायको नावाचं वादळ अजून
वादळापूर्वीच्या शांततेत असतं
'आज काय चुकलं आपलं
काय आपला झाला गुन्हा
कालच्या कोणत्या चुकांपैकी
चूक आपण केली पुन्हा?'
विचार तुम्ही करत रहाता
प्रश्नात तुम्ही पडत रहाता
बायको नावाचं वादळ एव्हाना
घोंघावण्याच्या तयारीत असतं
बघता बघता वादळाचे
डोळे आता भरू लागतात
बघता बघता वादळामधून
शब्द आता झरू लागतात
ऐकून तुम्ही घेता सारं
ओसरू देता वेडं वारं
बायको नावाचं वादळ आता
शांत व्हायच्या मार्गावर असतं
तुमचं चुकलं नसलं तरी
तुम्ही 'सॉरी' म्हणून टाकता
तुम्हाला लागलं नसलं तरी
तुम्ही आपलं कण्हून टाकता
वादळ वारं आपलंच असतं
सारं.. सारं... आपलंच असतं
बायको नावाचं वादळ एव्हाना
कोसळून दमून गेलं असतं
कोसळून जाऊन तुमच्याकडे
हळुच बघतं वादळ
तुमच्याकडे अपेक्षेनं बघत
हळुच हसतं वादळ
तुम्ही सारं विसरून जाता
क्षणात हात पसरून जाता
बायको नावाचं वादळ आता
तुमच्या मिठीत शिरलं असतं!

सगळ्या प्रेमकथांची अखेर...

सगळ्या प्रेमकथांची सुरुवात
गोड बोलण्यानंच होते
सगळ्या प्रेमकथांची अखेर
मटार सोलण्यानंच होते!
प्रेमात दोघं असतात तेंव्हा
सगळं गुलाबी वाटत असतं
एकमेकांना प्रेमानं दिलेलं
पाणीही शराबी वाटत असतं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
पाण्यानंही झिंगून जाण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते!
प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा
'हात' एकमेकांसाठी धरले असतात
दोघंजणं एकमेकांसाठी
राजा-राणी बनले असतात
प्रेमकथांची सुरुवात अशीच
एकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
एकमेकांना झब्बू देण्यानं होते!
प्रेमामधे एकमेकांबद्दल
जे जे काही कळलं असतं
संसारात त्याच गोष्टींवरून
एकमेकांना छळलं जातं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
कळूनही न कळण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
छळून छळून छळण्यानं होते!
एकमेकांच्या वागण्यामधे
आपल्याला फक्त चुका दिसतात
एकमेकांच्या शब्दांमधे
चाबूक आणि बंदुका दिसतात
जे जे होणार नाही वाटतं
ते ते सारं घडत जातं
प्रेमकथेच्या शेवटी शेवटी
सारं सारं बिघडत जातं!
(हे असलं तरी आपण काय करुया)
असंच जरी होत असलं
असं आता होणार नाही
तुझ्या माझ्या कथेला राणी
शेवट अता असणार नाही
तुझ्या माझ्या श्वासांमधे
रोज मोगरा गंध भरेल
मावळणाऱ्या दिवसासोबत
हृदयामध्ये चंद्र उरेल
रोजचा सूर्य आपल्यासाठी
नवी कथा घेऊन येईल
तुझी माझी प्रेमकथा
रोज नव्यानं सुरू होईल
तुझी माझी प्रेमकथा
रोज नव्यानं सुरू होईल

मूर्खता - एक अभ्यास!

आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक मूर्ख माणसं भेटत असतात. घरामध्ये, रस्त्यावर, ऑफीसात, बसमध्ये, स्टेशनवर, सरकारी कचेरीत, मित्रांच्या कट्ट्यावर... जिथे जाऊ तिथे वेगवेगळ्या रूपातले मूर्ख त्यांच्यातल्या मूर्खतेसह आपल्या समोर येत रहातात. त्यांच्या वागण्या बोलण्याचा आपल्याला भरपूर त्रास होत असतो. आपण नेमकं काय केलं, कसं वागलं तर हा त्रास कमी होईल याची आपल्याला कधीच टोटल लागत नसते.
आपल्याला होणारा हा त्रास कमी कसा करावा असा प्रश्न तुम्हाला पडतो का? त्याही पुढे जाउन मुळात जगात एवढे मूर्ख का आहेत असा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? मला पडतो! गेली अनेक वर्षे पडतो आहे. या प्रश्नावर विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की जगात मूर्खांची फक्त संख्याच जास्त नसून त्यांच्या मूर्खतेत वैविध्यही बरंच आहे! म्हणजे जगात एकाच प्रकारचे मूर्ख नसून हे जग विविध प्रकारच्या मूर्खांनी भरलेलं आहे. आता विविध प्रकार आहेत कळल्यावर त्याची वर्गवारीही केली पाहिजे ना. तर या विविध प्रकारच्या मूर्खांची वर्गवारी करायचा प्रयत्न केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की जगात एकूण १२ प्रकारचे मूर्ख आहेत. मला जे प्रकार सापडले त्याच प्रकारचे मूर्ख तुम्हालाही सापडतात का हे तुम्हाला तपासून बघता यावं म्हणून ते प्रकार इथे थोडक्यात मांडतो आहे.
हे प्रकार आपल्या समोर मांडताना मी कोणतही 'शहाणपणाचं' कृत्य करतो आहे असा माझा बिलकुल दावा नाही आणि मांडलेल्या या प्रकारांमधली कोणतीही लक्षणं माझ्यात नाहीत असंही मला सांगायचं नाही. मला वेडाच्या भरात जे सुचलं ते माझ्या मूर्खतेच्या ओघात आपल्याला सांगण्याचा हा एक वेडसर प्रयत्न आहे! हा लेख आणि यातले विचार वाचून आपल्या आयुष्यात कोणताही गुणात्मक बदल होईल असं मला वातत नाही... आणि समजा झालाच तर तो एक निव्वळ योगायोग समजावा!
मूर्खांचे मला समजलेले प्रकार आपल्या समोर मांडताना मी प्रत्येक प्रकाराचं नाव, त्याच्या लक्षणांचं वर्णन करणारा एक छोटा श्लोक आणि त्या प्रकाराची एका वाक्यातली माहिती एवढंच दिलं आहे. मी मुद्दामच सविस्तर वर्णन आणि उदाहरणं दिलेली नाहीत! याचं मुख्य कारण असं की आपल्या सभोवताली आपल्याला हे सर्वच प्रकार नेहमी पहायला मिळतात! चाणाक्ष वाचकांना आपल्याला भेटलेली कोणती व्यक्ती कोणत्या प्रकारची आहे हे नक्कीच कळू शकेल.
आणखी एक गंमत अशी आहे की कोणतीही व्यक्ती ही केवळ एकाच मूर्खांच्या प्रकारामधे असते असं नाही... अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्खतांचं सुरेख मिश्रण प्रत्येक मूर्खामधे असतं! आणि वेगवेगळ्या प्रसंगांमधे आपापल्या भात्यांमधून वेगवेगळे बाण काढून वापरायची क्षमता त्यांच्या जवळ असते!
तर मला वाटणारे मूर्खांचे १२ प्रकार असे
१. पढत मूर्ख
सूर्याशिवाय उन | वाद्याशिवाय धून |
सदसदविवेकहीन | तो पढत मूर्ख |
अर्थात: पुस्तकी पंडित, नियम, पॉलिसीज इत्यादीवर सतत बोट ठेवून वागणारे, अजिबात साधा कॉमन सेन्स (!) नसलेले..
२. चढत मूर्ख
बुद्धी शिवाय शक्ती | भावाशिवाय भक्ती |
आहे 'सलामसक्ती' | तो चढत मूर्ख |
अर्थात: पंत मेले राव चढले टाईपचे, कुठलेही qualification अथवा गुणवत्ता नसताना सत्तास्थानी असलेले
३. कढत मूर्ख
पारा थरारलेला | झारा उगारलेला |
आत्मा पिसाळलेला | तो कढत मूर्ख |
अर्थात: सदैव भडकलेले, भडकणारे... अंगाचा तीळपापड, तळपायाची आग मस्तकात इत्यादी इत्यादी
४. अडत मूर्ख
ओठी सदैव 'नाही' | पूर्णात न्यून पाही |
करतो न काम काही | तो अडत मूर्ख |
अर्थात: जमेल तिथे, जमेल तशी, जमेल त्याची अडवणूक करणारे... 'अडवा आणि जिरवा' मधे सुख मिळवणारे
५. गढत मूर्ख
कामास वाहिलेला | कामास बांधलेला |
कामात संपलेला | तो गढत मूर्ख |
अर्थात: रत्रंदिवस फक्त काम करणारे... कामाशिवाय दुसरं काहीही सुचत नाही असे... workoholics...
६. मढत मूर्ख
पैशात पोहणारा | सोन्यात नाहणारा |
'श्रीमंत' भासणारा | तो मढत मूर्ख |
अर्थात: सतत पैसा पैसा करणारे... आपली श्रीमंती मिरवणारे... त्यातच सगळा आनंद शोधणारे
७. लढत मूर्ख
कोठेही 'खुट्ट' काही | संताप यास येई |
आंदोलनास जाई | तो लढत मूर्ख |
अर्थात: सदैव कुठल्याही लढाईला तत्पर असलेले... काही झालं की घसा ताणून बोलणारे, बाह्या सरसावणारे... मारामारीला तयार असणारे...
८. रडत मूर्ख
डोळा सदैव पाणी | प्यॅ प्यॅ सदैव वाणी |
गाणी उदासवाणी | तो रडत मूर्ख |
अर्थात: गुळुमुळु मुळुमुळु प्रकारचे.... सतत सतत फक्त रडणारे
९. जडत मूर्ख
आवेग घे दुज्यांचा | आवेशही दुज्यांचा |
नाहीच जो स्वतःचा | तो जडत मूर्ख |
अर्थात: मूर्खपणाही स्वतःचा नसून दुसर्‍याचा मूर्खपणा जडलेले!
१०. पडत मूर्ख
भासे सदैव दीन | बोली सदैव न्यून |
म्हणतो स्वतःस हीन | तो पडत मूर्ख |
अर्थात: पडखाउ, पडेल वृत्तीचे... सतत स्वतःला कमी लेखणारे
११. गिळत मूर्ख
जो की उगाच चरतो | जे जे दिसेल भरतो |
'खा खा' सदैव करतो | तो गिळत मूर्ख |
अर्थात: खाण्यासाठी जगणारे!
१२. पिळत मूर्ख
तोंडी भिजे न तीळ | मारे अफाट पीळ |
ऐकून 'दातखीळ' | तो पिळत मूर्ख|
अर्थात: दिसेल त्याला पकडून सुचेल त्या विषयावर थकेपर्यंत पीळ मारणारे
(यातील सर्व अथवा आपल्याला लागू पडणार्‍या श्लोकांचं दररोज सकाळ संध्याकाळ नियमित पठण केलं तर मूर्खांपासून आपल्याला होणार्‍या त्रासाचं एका आठवड्यात निराकरण होतं असा काही भाविकांचा दावा आहे!)
मूर्खतेचं मूळ
मूर्खांचे एवढे नमुने पाहिल्या नंतर मला प्रश्न पडतो की जगात एवढे, एवढ्या प्रकारचे मूर्ख आहेत तरी कशामुळे? या एवढ्या मूर्खतेचं मूळ काय?
प्रत्येक व्यक्ती ही जन्मते, जगते आणि मरण पावते. गेल्या ३० - ४० हजार वर्षांमधे या क्रमामधे काहीएक बदल झालेला नाही. कुठेही जन्म झाला, कशाही प्रकारे जीवन व्यतीत केलं तरी एक ना एक दिवस प्रत्येकजण निश्चितपणे मरण पावतो. तसंच, या विश्वामधे हजारो आकाशगंगा आहेत. प्रत्येक आकाशगंगेत लाखो तारे आणि कोट्यावधी ग्रहमंडलं! या अफाट पसार्‍यातल्या कुठल्यातरी एका पृथ्वी नावाच्या चिमुरड्या ग्रहावरती, कुठल्याशा चिमुटभर गावात जन्माला येउन आपण काही फार मोठा तीर मारत नाही! आपल्या जगण्यानी या अफाट विश्वामधे काहीएक फरक पडत नाही आणि मरणानी तर नाहीच नाही... असं असूनही आपण स्वतःला या विश्वाच्या केंद्रस्थानी मानतो. आपली अनंत स्वप्नं, इच्छा, आकांक्षा, ध्येयं, ईर्षा आणि हव्यास आपण हृदयाशी बाळगून जगत रहातो. आणि आपलं संपूर्ण आयुष्य या हव्यासांच्या मागे धावण्यात घालवतो. पैसा, प्रसिद्धी, सत्ता, मालमत्ता... जे जे काही मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर धावत रहातो ते सारं सारं आपल्याला इथेच ठेवून जावं लागणार असतं. आणि हे असं इथेच सोडावं लागणार आहे हे माहित असूनही ते मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर झटत रहातो. हेच सार्‍या मूर्खतेचं मूळ!
पढतमूर्खापासून ते पिळतमूर्खापर्यंत सर्वच मूर्ख काही ना काही मिळवण्याच्या हव्यासापोटीच आपल्यातल्या मूर्खतेचा आविष्कार होवू देत असतात. सार्‍यांच्या वागण्या बोलण्या मधे या मूलभूत मानवी मूर्खतेची वेगवेगळी रूपं आविष्कृत होत असतात.
आपल्या आजुबाजूला आणि मुख्य म्हणजे आपल्या स्वतःमधे असलेली मूर्खता जर इतकी मूलभूत आणि सर्वव्यापी असेल तर त्यावर उपाय काय? या मूर्खतेतून मुक्त होण्यासाठी मार्ग कोणता?
हे उपाय आणि मार्ग शोधण्याचे माझे प्रयत्न चालू आहेत. सापडलेच तर आपल्याला निश्चित कळवेन! जर तुम्हाला सापडले तर मला कळवायला विसरू नका! ते सापडे पर्यंत स्वतःमधल्या मूर्खतेची संपूर्ण ओळख करून घ्यायची आणि तिच्याशी मैत्री अरून आनंदानं रहायची माझी धडपड सुरू आहे...

पुणेरी शब्दार्थ !!!!

माझ्या एका मित्राकडे हा एक संग्रह होता. त्यातूनच मी देत आहे ...
१. केशव:- साधा सरळ माणूस, नका समोर बघून चालणारा.
२.सामान:- त्याची प्रेयसी.
३.काटा काकू:- चांगली दिसणारी, पण वयाने जास्त.
४.खडकी:- एकदम टुकार.
५.झक्कास:- एकदम चांगले.
६. काशी होणे:- गोची होणे.
७. लई वेळा:- नक्की, खात्रीने.
८. चाल हवा येऊ दे:- निघून जा.
९. मस्त रे कांबळे:- छान, शाब्बास.
१०.पडीक:- बेकार.

११. मंदार:- मंद बिद्धीचा.
१२. चालू:- शहाणा.
१३. पोपट होणे :- फजिती होणे.
१४.दत्तू :- एखाद्याचा हुजाऱ्या.
१५.ब्याटरी :- चष्मेवाला/ चश्मेवाली.
१६.पुडी - माणिकचंद/ दुसरा गुटखा.
१७ राष्ट्रगीत वाजणे:- संपणे/ बंद होणे.
१८. पुडी सोडणे:- थाप मारणे.
१९.खंबा :- दारू/ बीयरची बाटली.
२०. पावट्या:- एकदम मूर्ख.
२१.खडकी- दापोडी :- हलक्या प्रतीचे.
२२.टीनपाट:-काहीच कामाचा नसलेला.
२३.पेताड/ बेवडा:- दारू पिणारा.
२४.डोलकर :- दारू पिऊन झिंगणारा.
२५.सावरकर:- दारू पिऊन झीन्गानार्याला सावरणारा.
२६.वखार युनुस:- दारू पियुन ओकारी करणारा.
२७.सोपान:- गावनढल माणूस
२८.श्यामची आई :- १८ + सिनेमा.
२९.सांडणे:- पडणे.
३०.जीवात जीव येणे :- गरोदर राहणे.
३१.भागवत :- दुसर्याच्या जीवावर जगणारा.
३२.पत्ता कट होणे :- शर्यतीतून बाहेर येणे.
३३.फणस लावणे :- नाही त्या शंका काढणे.
३४.फिरंगी:- कोकाटे इंग्रजी फाडणारा.
३५.पेटला:- रागावला.
३६.चड्डी:- खूप जवळचा माणूस.
३७.हुकलेला:- वाया गेलेला
३८.डोळस:- चष्मेवाला/ ली.
३९.यंत्रणा:- जाड मुलगी.
४०.दांडी यात्रा:- ऑफिस ला सुट्टी मारणे.
४१.चैतन्य कानडी :- सिगरेट/बिडी.
४२.चेपणे :- पोटभरून खाणे.
४३.कल्ला :- मज्जा.
४४.सदाशिव पेठी :- कंजूस.
४५.टांगा पलटी :- दारूच्या नशेत out झालेला.
४६.थुंका लावणे :- गंडवणे.
४७.LLTT :- तिरळा, लुकिंग लंडन टोकिंग टोकियो
४८.घ्या श्रीफळ :- जा आता घरी .
४९.कर्नल थापा :-थापाड्या
५०.सत्संग :- ओली पार्टी.

Wednesday, August 4, 2010

मैत्री

"शरदाचं चांदण, 

वसंताचा बहर, 

श्रावणाची पालवी या सर्वाहुन अधिक मनमोहक आकर्षक कोण? 

निरपेक्षपणे मैत्री हेच शब्द कानावर येतील."
मैत्री म्हणजे एक रोपट असतं जे जमीनीत पुर्णपणे रुजलेल असतं वर दिसत त्याच्या दुप्पत जमीनीत असतं ज्याचा गाभा शोधन केवळ अशक्य असतं. "पाणी रे पाणी तेरा रंग कौसा" हे कधि कुणी सांगू शकेल का? 

तसचं मैत्रीच आहे. ति कशी असते, कधि होते कुणासोबत व का होते? हे कुणालाच कधिच कळत नाही. पण जेव्हा मैत्री होते तेव्हा मात्र आपण वेगळेच कुणीतरी होऊन स्वच्छंदी पाखराप्रमाणे आकाशात तरंगत असतो.
मैत्रीमध्ये रंगीत धुंदी असते. यामध्ये वय, वेळ, समाज कशाचच बंधन रहात नाही.
मैत्री असते स्वच्छ निर्मळ पाण्यासारखी
पौर्णिमेच्या लख्ख चंद्रासारखी
त्या इवल्याशा पणतीच्या इवल्या वातीसारखी
कृष्णाच्या प्राणप्रिय राधेसारखी
व वनवासातही सोबत करणाय्रा सितेसारखी.
मैत्रीतही अनेक प्रकार असतात, जसे काहीतरी हेतू ठेवून केलेली मैत्री, समोर आहे म्हणून झालेली मैत्री आणि भावनिकरीत्या आपणहून नकळत झालेली मैत्री. नकळत झालेली मैत्री असते तिच खरी मैत्री होय. खरचं आपण आई-वडिलांशी जितकं समरस होऊन बोलू शकत नाही तितकं आपल्या मित्रांशी बोलतो. मग ही एक अद्वितीय शक्ती मानायला काहीच हरकत नाही.
मित्र म्हणजे कोण असतं असं म्हणण्यापेक्षा मित्र कोण नसतो हे विचारायला पाहिजे. मित्र म्हणजे आई, बहिण, पत्नी, शेजारी व शत्रुही असतो कारण एक सच्चा मित्र या सगळ्या भुमीका पार पाडतो. तुम्ही म्हणाल की मित्र शत्रु कसा असू शकतो, तर आपला मित्र चुकत असेल तर खरा मित्र प्रसंगी त्याचा विरोध करुन परिणामी शत्रु बनुन आपल्या मित्राच्या हिताचे रक्षण करतो. मित्र म्हणजे जणू एक परीस असतो जो आपल्या स्पर्शाने मित्रामधले दोष बाजुला सारून त्याच्यात स्वत:च्या गुणांची भर घालतो व मित्राचं जिवण उजळून काढतो. जो आपल्या मित्राच्या वाटेतले काटे वेचून त्याच्या वाटेत फ़ुलांच्या पायघड्या तयार करतो. व त्याच्या पायातले काटे स्वत:च्या हातांनी बाजुला काढतो. तोच खरा दिलदार मित्र होय.
मैत्रीत कशाचही बंधन नसतं ति एक मुक्त मोरणीप्रमाणे आपल्या मोराला (मित्राला) साद घालत असते. मग तो मित्र मुलागा, मुलगी, आई, आई, प्राणी, पक्षी कुणीही असू शकतं मैत्रीमध्ये फ़क्त भावना महत्त्वाच्या असतात. मैत्री संगतीत जितकी फ़ुलते बहरते तितकीच ति विरहात तिव्रतेने जाणवते तिचं महत्त्व कळतं आणि तिची आवश्यकता जाणवू लागते.
मैत्री स्वच्छ आहे तितकीच ति स्वतंत्र आहे. ज्यावेळी हा/ही माझा मित्र आहे हे सांगताना आपली जीभ थरथरत नाही किंवा आपण अडखळत नाही, जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राची ओळख छातीठोकपणे करुन देऊ शकता तेव्हा तुमची निखळ व सच्ची मैत्री आहे असं मानायला कुठल्याही पुराव्याची किंवा वारश्याची गरज तुम्हाला भासणार नाही.
प्रत्येक नात्याला एक संकल्पना एक विशिष्ट साचा असतो. तसा मैत्रीला नसतो मैत्रीची व्याप्तीच एवढी मोठी आहे की तिला तोलनं किंवा मोजण शक्यच नाही. प्रत्येक नात्यला रक्ताची ओळख सांगावी लागते म्हणजे समजा भावाचं नात सांगण्यासाठी वडिलांच नाव पण मैत्री हे जगातल एकमेव असं नात आहे ज्याला आणि रक्ताची ओळख सांगावी लागते पण मैत्री हे जगातल एकमेव अस नात आहे ज्याला रक्ताची काहीच गरजा नाही व हे नात कुणाकडून उधार घेता येत नाही व वारसाहक्कानेही मिळत नाही त्यामुळे ते निप:क्ष, स्वच्छ जलाशयाप्रमाणे चकाकत राहतं.
मैत्रीचा उगम कोठून व कोणापासून झाला असेल हे एक कधिही न उलगडणारे कोडे आहे. कितीही शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, तज्ञ एकत्र येऊन रिसर्च सुरु केला तरी या प्रश्नाचं उत्तर सापडणं या जन्मात तरी शक्य नाही. पण तरीही यातील भावना, याचा उद्देश व याचं स्वरुप व प्रकटीकरण पाहण आवश्यक आहे.
मैत्री एक हळुवार कोमल संवेदना आहे. याला शब्दात बांधण कठीण आहे व बांधण्याचा प्रत्यत्न केला तर गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे ते हातातून निसटतं व दूर जाऊन मनमोहक हसू लागतं. खरचं ज्या नात्याला उगम नाही ज्याचा जन्मच नाही ते नात इतक दढ का होतं? अशी कोणती शक्ती आहे जिच्यामुळे या नात्याची गुंफ़ण घट्ट गुंफ़ली गेलीय. मैत्रीत एकटेपणा घालवण्याची, आनंदी ठेवण्याची क्षमता खुपच संस्मरणीय वाटते. आपल्या मित्रापासून दूर गेल्यानंतर आपण आपल्या मित्राला सतत आठवतो त्याची उणिव क्षणाक्षणाला जाणवायला लागते तेव्हा आपल्याला आपोआप आपल्या मैत्रीतली दृढता समजते व जेव्हा ती समजते तेव्हा आपण खय्रा अर्थाने मित्र म्हणून मिरवण्यास पात्र ठरतो.
रुपेरी वाळूमध्ये स्वच्छ कोजागीरीच्या आनंददायी रात्री जे प्रसन्न मोहक वातावरण असतं तसा अनुभव मित्राला मित्राच्या मैत्रीमध्ये जाणवतो. ते मित्र नेहमीच एकमेकांच्या सहवासात राहण्यास अतुरतात व जोशात येऊन धुंद होऊन जनमताची, जात-पात, धर्म यांची पर्वा न करता बेफ़ामपणे मैत्रीच्या सुरात गात सुटतात, "ये दोस्ती हम नही तोडेंगे" पण खर तर दोस्ती तुटायची नाही हे म्हणताना ते विसरतात की तुटते ती मैत्री नसतेच शेवटी मैत्री म्हणजे अखंडता, अतुटता यांचा बंध आहे.
"मैत्री म्हणजे नावं असतं, स्वत:मध्ये गजबजलेल गाव असतं.
मैत्री म्हणजे सदृढ स्वच्छ काया, जि मित्रावर करते आईप्रमाणे माया
मैत्री म्हणजे असते एक जागा, गुंतला जाते मित्राचा त्यामध्ये धागा"

अशा वैश्विक मैत्रीबद्दल मी लिहीत बसलो  तर माझं आयुष्य सुध्दा कमी पडेल पण यावर लिहिणं संपणार नाहे. याविषयी लिहिण्यासाठी परत एकदा व्यास किंवा वाल्मिकी यांनाच बोलवाव लागेल पण त्यांनाही या महासागराला शब्दबध्द करण कितपत शक्य होईल याबद्दल शंकाच आहे.
एवढ्या सुंदर विषयावर माझ मत मांडण्यास मला प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या मित्रांना कोटी-कोटी धन्यवाद