Friday, January 7, 2011

का ग तु अशी वागतेस गं....

तुला पाहिलं कि हृदयाची घंटा वाजते.
तुझि उपस्थिति अख्ख्या जगाचं सुख देउन जाते.
तुझ्या बरोबर जगलेले दिवस,
आयुष्याला खुप आठ्वणी देउन जातात.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ..

तुला पाहिलं कि स्वतःला विसरतो,
तुला पाहिलं कि स्वतःला हरवतो,
तुला पाहिलं कि जगच ठेंगन वाटत.
तु प्रत्येक गोष्ट किति सहजतेने समजुन घेतेस ग.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ग.

तुला खुप जाणावस वाटत,
तुला खुप ऒळ्खावस वाटत,
सारख तुझ्या सानिध्यात रहावस वाटत.
सर्वात मिसळून जाण्याचि तुझि ति अदा.........
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ग.

तुझा तो अबोलेपणा, निरागसते चा प्रितिपणा,
मला तुझ वेड लाउन जात.... वेड....
आनंद व्यक्त करणारि तुझी अदा,
जगण्याला महत्व देउन जाते.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ग.

तुझ हसणं, तुझ रुसण,
माझ्या आयुष्याला जणू ऊद्देश देउन जातं.
आयुष्यात जणू तुझीच गरज होती,
अस्सं वाटायला लागतं
तुझा विचार जरी मनात आला ना........
तरी गालावर एक गोड्सं हसु देउन जातं.
मग पुन्हा पुन्हा विचारवसं वाटत ग....
का ग तु अशी वागतेस गं....
का ग तु अशी वागतेस गं....

Thursday, January 6, 2011

पुण्याहून पत्र

नकार देणे ही कला असेल.. पण, होकार देऊन काहीच करणे , ही त्याहून मोठी कला आहे.


************ ********* ********* ********* ********* ********* *********
जसा मच्छर मारून तू
शिकारी बनणार नाहीस
तसाच १०-१२ एसेमेस फॉरवर्ड केल्याने तू भिकारी बनणार नाहीस

------------ --------- --------- --------- --------- --------- --------- --------- ---------
तू झाडावर चढू शकतोस का ? संजीवनी आणू शकतोस का ? छाती फाडून राम-सीता दाखवू शकतोस का? नाही ना?
... अरे वेड्या , फक्त माकडासारखं तोंड असल्यानं कुणी हनुमान होत नाही!!!!

************ ********* ********* ********* ********* ********* *********
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात. तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात. एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो... ... का?
..अंगात मस्ती , दुसरं काय ?
************ ********* ********* ********* ********* ********* *********
जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते ,
असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का ?

जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!
************ ********* ********* ********* ********* ********* *********
हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं!!!
************ ********* ********* ********* ********* ********* ********* ********* *********
प्रश्न् : चीनची लोकसंख्या ओलांडून भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरला, तर त्याचे वर्णन फक्त दोन शब्दांत कसे कराल ? उत्तर : चीनी कम!!!!
************ ********* ********* ********* ********* ********* ********* *
तुफान पाऊस पडतोय...
तुला वाटत असेल
छान बाहेर पडावं
भिजून चिंब होत
पाणी उडवत
गाणं गाताना
कुणीतरी खास भेटावं... हो ना? अरे, हो म्हण ना, लाजायचं काय त्यात? प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!
************ ********* ********* ********* ********* ********* *********
ट्रिंग ट्रिंग

हॅलो

हॅलो, प्रकाश आहे का?
नाही.
मग खिडकी उघडा , प्रकाश येईल.
************ ********* ********* ********* ********* ********* *********
'' सर, तुम्ही मला शून्य मार्क दिलेत या पेपरात. हे मला बिलकुल मान्य नाहीये,'' ढब्बू ढगोळे तणतणत म्हणाला... '' अरे, ढब्बू, तुलाच काय, मलाही मान्य नाहीत हे मार्क,'' खंडेराव खत्रूड सर म्हणाले, '' पण, शून्यापेक्षा कमी मार्क देताच येत नाहीत ना रे!!!!''
************ ********* ********* ********* ********* ********* *********
पुण्याहून पत्र

प्रिय बाबा, शि. सा. . वि. वि. मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप पोहोचलो. इथे बऱ्याच गंमती पाहायला मिळत आहेत. पुणेकरांचं जुनं वाहन म्हणजे सायकल. आपल्या गावात जसे देवाला सोडलेल्या रेड्याला काही करत नाहीत , तसंच इथे सायकलस्वारांना कोणतेही नियम लागू नाहीत.
इथलं सध्याचं वाहन म्हणजे बाइक. त्यांना इंधनबचतीचं महत्त्व खूपच पटलं आहे. त्यामुळे ते दुचाकीवर तीनजण बसतात.
सिग्नलपाशी लाल दिवा असला , तरी सहसा थांबत नाहीत. त्यामुळे पेट्रोल जास्त जळते ना.
वळताना हात दाखवायचा , तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे! म्हणून हात दाखवण्याचे कष्ट कुणी घेत नाही.
हात दाखवून अवलक्षण व्हायला नको म्हणून रिक्षावाले तर पायानं वळण्याचा इशारा करतात.
इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात. आहे ना गंमत ? अशाच काही गंमती पुढच्या पत्रात.

तुमचा लाडका.
सुनील