Friday, June 17, 2011

आणि तिचे नसणे सुद्धा

एक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही सुंदर तिची आपल्या नवर्यावर प्रेम करण्याची पद्धत होती .............. 
जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात असे तेव्हा तेव्हा ती रोज एक गुलाबाचे फुल आपल्या नवर्याला पाठवत असे, आणि जाणवून देत असे कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच आहे .................... 
ती दुसरीकड......े असताना तिच्या रोज येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखद सवय झाली होती ........... पण, 
कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे सुंदर प्रेम देवालाही आवडले असावे म्हणून कि काय पण देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले, 
तिच्या विमानास अपघात झाला आणि बिचारी आपले प्राण गमावून बसली ..................... 
हि बातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कोणी एवढे रडले नसेल .................. 
पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता सुरु झाले होते, तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते............... 
हे बघून तिचा नवरा आश्चर्य चकित झाला व ह्या मागाचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणार्या मुलास विचारले
तिचा नवरा :- तुला हे फुल कोण देत नक्की, माझी बायको मरून १५ दिवस झाले तरी तू रोज फुल आणून देत आहेस, नक्की प्रकार काय आहे ?
मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप प्रेम करते, तिची विचारशक्ती खूप पुढची होती, म्हणून तिने आधीच विचार करून ठेवला होता कि, "जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण प्रेमाला कधी संपवायचे नाही" आणि ह्या विचाराने तिने मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत जेणे करून आयुष्यभर ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल .... आणि तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव करून देईल

पावसाचे दोन थेंब...

 
 
पावसाचे दोन थेंब ढगातुन निघाले.वार्याच्या प्रवाहाशी झुंजत, ढगाच्या तुकड्यांना चुकवत, पृथ्वीच्या दिशेने.दोघेही गप्प होते.एकाला रहावल नाही, त्यान संवाद सुरु केला-"आता पृथ्वीवर एकत्र प्रवास करायचाच आहे, बोल ना काहीतरी."
मग दूसरा बोलला,"मी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतोय."
"आता काही मैलांचा प्रवास उरलाय, आता अंतर्मुख होउन काय करणार आहेस?" 
 

"आयुष्याच्या शेवटीच तर अंतर्मुख व्हाव लागत.आपला वेग आपल्या हाती नाही, आपली दिशा आपल्या नियंत्रनात नाही आणि कपाळमोक्ष तर ठरलेलाच आहे!""मग आपल्या हाती काहीच नसताना विचार करुन आणि अंतर्मुख होउन काय करणार आहेस?त्यापेक्षा छान गप्पा मारू आणि वेळ आली, की अनंतात विलीन होउन जाऊ." 
 
"त्याने काय होणार? कपाळमोक्ष टळणार आहे का आपला?"
"अच्छा, म्हणजे तुला काळजी लागुन राहिली आहे ती तुझ अस्तित्व संपून जाण्याची!"
"का?तुला नाही लागुन राहिली आहे काळजी?"
"नाही.आपला ढगात जन्म होतो, त्याच क्षणी आपल भवितव्य ठरलेल असत.ढगाला आपला भार असह्य झाला, की तो आपल्याला सोडून देणार.मग गुरुत्वाकर्षणाच्या ताब्यात जाउन खाली डोक वर शेपुट असा आपला प्रवास सुरु होतो.यात आपण काय करू शकतो?"...
"पृथ्वीवर पाण्याला जीवन म्हणतात आणि जीवनाच्या थेंबाला  स्वताचा जीव राखन्याच स्वातंत्र्य नाही,हे अजबच."
"हे बघ, आपला कपाळमोक्ष होतो म्हणजे काय? तर थेंबाच अस्तित्व संपत.आपला जीव जात नाही,फ़क्त रूप बदलत!"
 

"मी  थेंब आहे आणि पडल्यावर थेंब राहणार नाही, एवढ मला कळत."
"तू पाणी आहेस आणि पाणीच राहणार आहेस,एवढ समजुन घे.तू म्हणजे Hydrogen चे दोन रेणू आणि Oxigen चा एक! तलावातही आणि समुद्रातहि!"
"बरा भेटलास,बोल,काय गप्पा मारणार होतास माझ्याशी?"
 

"अरे,गप्पा मारायला काय हजार विषय आहेत.मी तुला प्रश्न विचारतो, आपण का पडतो?"
"हा काय प्रश्न झाला?""म्हणजे अस बघ, बेडूक घसे फुगवून त्यांच्या प्रेयासिला बोलावतात आणि आपली आराधना करतात म्हणुन आपण पडतो, की एखादी आजी देव पाण्यात बुडवून बसते म्हणुन आपण पडतो..."
"अरे तुला काय खूळ लागल का? आपण पडतो त्याच्याशी यापैकी कशाचाही संबंध नाही.निसर्गचक्र म्हणुन पडतो आपण."
"चूक!"
"हे बघ, आपण पडतो त्याला उगाचच काहीतरी महान अर्थ चिकटवत पडू नकोस."
 

"पण, समज आपण स्वताचा असा समज करुन घेतला, की आपण त्या बेडकांसाठीच पडतो आणि आपल्या वर्षावात भिजुन बेडूक-बेडकी प्रनयात धुंद होतात......मादी अंडी देते.हजारो बेडूक जन्मतात, ते किड्यांना  खाऊन पृथ्वी स्वच्छ ठेवतात. त्या बेडकांना खाऊन साप जगतात..."
"बापरे, मी हा असा विचारच केला नव्हता कधी..."
 

"समज, कुणीतरी पर्जन्यदैन्य  होता म्हणुन आपण पडलो.पाउस पडून काही कोणाचा व्यक्तिगत फायदा नाही.मग यांच्यामुळे आपण पडलो, अस समजायला काय हरकत आहे?"
"खरच, काहीच हरकत नाही आणि एखादी प्रेमळ आजी जगासाठी देवाला पाण्यात बुडवून ठेवणार असेल, तर तेवढ्यासाठीच मी पडतो म्हणायला तर मला आनंदच वाटेल!"
 

"आता कस बोललास? नाही तरी आपण पडणार तर आहोच,मग त्या पडण्याला असा अर्थ दिला तर पडण्याला आणखी गम्मत नाही का येणार? आता आणखी एक गम्मत.तुला जर choice दिला आणि विचारल, की बोल तुला कुठे पडायचे  आहे, तर तू कुठे पडशील?"
"हे काय भलतच?"

 
 
"अरे गम्मत! ज़रा विचार तर करुन बघ.कुठेतरी दोन धुंद जीव एकमेकांना लगटून समुद्राकाठी फिरत असतील तर नेमक जाउन तिच्या ओठांवर पड़ाव,भेगाळलेली जमीन तहानेन व्याकुळ  होउन आकाशाकडे पाहत असते तिच्या तृप्तीचा  पहिला थेम्ब व्हाव,एखाद अवखळ मूल खिडकित बसून तळहात गजातुन बाहेर काढत असेल तर त्याच्या इवल्या हातांवर जाउन विसावाव.....एखाद नक्षिदार फुल पाखरू पंख पसरून फुलावर बसल असेल तर त्याचे रंग भिजवून टाकावेत...काहीही!" दूसरा थेम्ब ऐकता ऐकता हरखून गेला होता.पहिल्यान बोलन संपवल तेव्हा तो  भानावर आला आणि म्हणाला,"अरे आपले  आयुष्य  पण एवढे रोमांटिक,छान असू शकत, असा विचारच नव्हता केला मी कधी!"
 
 
एक आजोबा हातात पिशवी सांभाळत, वाऱ्याने उलटी होत असलेली छत्री सावरत कसेबसे चालत होते.पहिला थेंब त्यांच्या छत्रीवर पडला आणि मग घरंगळत जमिनीवर पडला.चाफ्याच डौलदार झाड़ दुधाळ फुल अंगावर लेवून हिरवी वस्त्र नेसून सजल होत.भार सहन न होउन पान वाकल आणि थेंबन जमिनीवर उडी घेतली.तितक्यात पहिल्यान दुसर्याला मिठीत झेलल.दूसरा म्हणाला,"आता मी वाट बघतोय, वाफ होउन ढगात जाण्याची आणि पुन्हा थेम्ब होउन बरसन्याची.थेम्ब होउन पडण्यात किती मजा असते, ते मला आज कळल!".
 

सुनील भूमकर 

संस्कृती

sansk-logo-final.jpg































|



शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी…
वांग्याचे भरीत.. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी.
केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ…
मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी…


दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार..
दिव्या दिव्यादिपत्कार… आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी…
मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी…
दस-याला वाटायची आपट्याची पाने…
पंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे…
सिंहगडावर भरुन आलेली छाती आणी दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श…

कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्र्श्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो.कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा….


पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो
जीवन त्यांना कळले हो…
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणे गळले हो
जीवन त्यांना कळले हो….

{पु.ल. देशपांडे}