तिर्थस्वरुप मणिरत्नम अण्णा यांस
साष्टांग नमस्कार...
विषय: रावण चित्रपटाच्या तिकिटाचे पैसे माघारी मिळणेबाबत..
बरेच दिवस झाले पत्र लिहले नाही...
कालच तुमचा रावण चित्रपट पाहिला.. पाहुन अतिशय दु:ख झाले...चित्रपट वाईट आहे याचे दु:ख नाही...तुमच्या नावावर आम्ही १5० रुपये वाया घालवले याचे दु:ख झाले... मला फोनवर मित्र आवर्जुन म्हणाला होता .." अरे, पिक्चर नका बघु..चांगला नाही.." पण तुमचा पिक्चर आहे म्हणुन आम्ही गेलो होतो...
पहिला तासभर आम्हाला कळालेपण नाही, आम्ही पिक्चर पाहतोय की डिस्कवरी चँनेल पाह्तोय..नुसतेच जंगल आणि ओढेनाले..
आमच्या मित्रांचा एक निरोप आहे... प्लिज आता अभिषेक काकांना आणि ऐश्वर्याकाकुंना भुमिका देणे बंद करा... खाण्यापिण्याचे लाड ठिक पण असले लाड काय कामाचे..
त्यांनी तुमच्या पैशात दुसरा हनिमुन केला...आणि तुम्ही बसला कँमेरा सांभाळत... आता कँमेरा जाऊन हाती कटोरा नाही आला म्हणजे कमावले... थोडा विचार करत चला..
आमच्या सारखे नोकरी करणाऱ्या गरीब लोकांना चांगले वाटतील, पचनी पडतील असे काही चित्रपट बनवा... हे पुणे आहे इथे चांगले तेच चालते..
एक मात्र त्या रेहमान भाऊना आठवणीने सांगा..पिक्चर चांगला नाही..पण म्युझिक एकदम मस्त आहे
कळावे, लोभ असावा... नाही नाही चुकले... या पुढे कोणताही लोभ नसावा,
--
(नाईलाजास्तव) आपला नम्र,
Puneri Punekar
पुणे
No comments:
Post a Comment