Monday, November 7, 2011

न्याय देवता तर रडली ...

एका कैद्याला फाशी देण्या आधी विचारलं 
तुझी शेवटची इच्छा काय आहे....??? 
अगदी फाशी देणार्याच्या अंगावरही सरसरून काटा आला अस उत्तर त्यान दिल... . . . ... .
"कसाबला फाशी होताना पाहायचा आहे...." . 
समोरचे पोलीस हि निरुत्तर झाले... न्याय देवता तर रडली ...

या अंधश्रद्धा "अंनिस"ने दूर करण्यासाठी आजवर काय कार्य केले?

शरद पवार, राहुल गांधी, मायावती देशाचे पंतप्रधान बनण्यास लायक
शरद पवार शेतकऱ्यांची व्यथा जाणणारा " जाणता राजा"
बी ग्रेड , बामसेफ , भारत मुक्ती मोर्चा, सेवा संघ या जातीय विद्वेष कमी करण्यास पुढे सरसावलेल्या संघटना आहेत
कॉंग्रेस ने आजवर देशात विकास केला
कॉंग्रेस आजीबात भ्रष्टाचारी नाही, जनहितासाठी लढणारा, आम आदमींचा पक्ष आहे
..
..
..
..
..
...
...
...
...
...
...
...
...
....
....
....
या अंधश्रद्धा "अंनिस"ने दूर करण्यासाठी आजवर काय कार्य केले?

LADIES FIRST.....:

एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं ठरवतात, मुलगा पहिले उडी मारतो,
पोरगी डोळे मिटते, आणि मागे फिरते.....
ते बघून पोरगा पाठीवरचं पॅरेशूट उघडतो आणि म्हणतो,
साली चेटकीण मला माहित होत ही उडी नाही मारणार ..............
.
.
त्या दिवसापासून लोकं म्हणू लागले......LADIES FIRST.....:


Monday, October 10, 2011

यमाच्या दरबारात

||यमाय नमः ||
एकदा एक गुजराती, युपी वाला भैया,आणि मद्रासी तिघ मेल्या नंतर  ,
स्वर्गात गेले,,,
तिथे यम महाराज सारी व्यवस्था स्वतः जातीने पाहत होते,
यमाने सार्यांची व्यस्थ उत्तम ठेव्याची आज्ञा दिली,
आणि वर आजून तुम्हाला काही सुविधा हव्यात का असेही विचारले,,
मोकळेपणाने सांगा लाजू नका मी नक्की मदत करेन यम म्हणाला,
त्यावर गुजराती भाई म्हणाला यम भाय वो नीचे मुंबईमा तो आ मराठी
लोको तो शांती थी जीव नथी देता,,,,
मारी दुकान फोडी नाकी,,
आ मराठी लोग एकदम जंगली छे,,
माने महारी बाजू मा मराठी माणूस नथी जोतो,,,
युपिवला म्हणाला ,,
श्रीमान यम महाराज, ईन मराठी लोगोने तो हमारा जीवन मुश्कील कर दिया है.
ईमानसे  ,मेरी दुकान का बोर्ड काला कर दिया है,,
कहते है कि दुकान का नाम मराठी भासा मा चाहिये .
अब बताव ये क्या बात हुई?
मुझे भी मेरे पडोस मी मराठी नाही चाहिये,,,
मद्रासी म्हणाला  ,,,
आय्यो यम्म हमको भी बाजुमे मराठी नाही मांगता,,,
 बहोत परेशान करता है ,
कुच काम करणे नही आता फिर भी होशियारी मारके कहता है
अये साला हि मुंबई आमची हाय हटाव लुंगी बजाव पुंगी
भागाव मद्रासी ,,,,
हे सगळ लक्षपूर्वक ऐकणार्या यमाने मग चित्रगुप्ताला हक मारली,,,
?
?
?
?
?
?
?
?
?
?
"ए चित्र्या आयला या शहाण्यांच्या फायली जरा
घेवून येरे बघतो एकेकाला ..."

Wednesday, October 5, 2011

A true Fact of Life:

Beemar Employee se uski biwi boli - Iss bar koi janwaro ke doctor ko
dikhao tabhi aap theek hoge...

Pati - Woh kyon?

Biwi - Roz Subah Murge ki tarah jaldi uthh jate ho...

          Ghode ki tarah bhag ke office chale jate ho...

          Gadhe ki tarah dinbhar kaam karte ho...

          Lomdi ki tarah idhar-udhar se information batorkar Report
banate ho...

          Bandar ki tarah boss ke ishare par nachte ho...

          Ghar aakar pariwar pe kutte ki tarah chillate ho,aur fir
Bhainse ki tarah so jate ho.

          Phir Insaano ka doctor tumhe kya khakh thik kar payega..!

Friday, June 17, 2011

आणि तिचे नसणे सुद्धा

एक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही सुंदर तिची आपल्या नवर्यावर प्रेम करण्याची पद्धत होती .............. 
जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात असे तेव्हा तेव्हा ती रोज एक गुलाबाचे फुल आपल्या नवर्याला पाठवत असे, आणि जाणवून देत असे कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच आहे .................... 
ती दुसरीकड......े असताना तिच्या रोज येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखद सवय झाली होती ........... पण, 
कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे सुंदर प्रेम देवालाही आवडले असावे म्हणून कि काय पण देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले, 
तिच्या विमानास अपघात झाला आणि बिचारी आपले प्राण गमावून बसली ..................... 
हि बातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कोणी एवढे रडले नसेल .................. 
पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता सुरु झाले होते, तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते............... 
हे बघून तिचा नवरा आश्चर्य चकित झाला व ह्या मागाचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणार्या मुलास विचारले
तिचा नवरा :- तुला हे फुल कोण देत नक्की, माझी बायको मरून १५ दिवस झाले तरी तू रोज फुल आणून देत आहेस, नक्की प्रकार काय आहे ?
मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप प्रेम करते, तिची विचारशक्ती खूप पुढची होती, म्हणून तिने आधीच विचार करून ठेवला होता कि, "जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण प्रेमाला कधी संपवायचे नाही" आणि ह्या विचाराने तिने मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत जेणे करून आयुष्यभर ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल .... आणि तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव करून देईल

पावसाचे दोन थेंब...

 
 
पावसाचे दोन थेंब ढगातुन निघाले.वार्याच्या प्रवाहाशी झुंजत, ढगाच्या तुकड्यांना चुकवत, पृथ्वीच्या दिशेने.दोघेही गप्प होते.एकाला रहावल नाही, त्यान संवाद सुरु केला-"आता पृथ्वीवर एकत्र प्रवास करायचाच आहे, बोल ना काहीतरी."
मग दूसरा बोलला,"मी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतोय."
"आता काही मैलांचा प्रवास उरलाय, आता अंतर्मुख होउन काय करणार आहेस?" 
 

"आयुष्याच्या शेवटीच तर अंतर्मुख व्हाव लागत.आपला वेग आपल्या हाती नाही, आपली दिशा आपल्या नियंत्रनात नाही आणि कपाळमोक्ष तर ठरलेलाच आहे!""मग आपल्या हाती काहीच नसताना विचार करुन आणि अंतर्मुख होउन काय करणार आहेस?त्यापेक्षा छान गप्पा मारू आणि वेळ आली, की अनंतात विलीन होउन जाऊ." 
 
"त्याने काय होणार? कपाळमोक्ष टळणार आहे का आपला?"
"अच्छा, म्हणजे तुला काळजी लागुन राहिली आहे ती तुझ अस्तित्व संपून जाण्याची!"
"का?तुला नाही लागुन राहिली आहे काळजी?"
"नाही.आपला ढगात जन्म होतो, त्याच क्षणी आपल भवितव्य ठरलेल असत.ढगाला आपला भार असह्य झाला, की तो आपल्याला सोडून देणार.मग गुरुत्वाकर्षणाच्या ताब्यात जाउन खाली डोक वर शेपुट असा आपला प्रवास सुरु होतो.यात आपण काय करू शकतो?"...
"पृथ्वीवर पाण्याला जीवन म्हणतात आणि जीवनाच्या थेंबाला  स्वताचा जीव राखन्याच स्वातंत्र्य नाही,हे अजबच."
"हे बघ, आपला कपाळमोक्ष होतो म्हणजे काय? तर थेंबाच अस्तित्व संपत.आपला जीव जात नाही,फ़क्त रूप बदलत!"
 

"मी  थेंब आहे आणि पडल्यावर थेंब राहणार नाही, एवढ मला कळत."
"तू पाणी आहेस आणि पाणीच राहणार आहेस,एवढ समजुन घे.तू म्हणजे Hydrogen चे दोन रेणू आणि Oxigen चा एक! तलावातही आणि समुद्रातहि!"
"बरा भेटलास,बोल,काय गप्पा मारणार होतास माझ्याशी?"
 

"अरे,गप्पा मारायला काय हजार विषय आहेत.मी तुला प्रश्न विचारतो, आपण का पडतो?"
"हा काय प्रश्न झाला?""म्हणजे अस बघ, बेडूक घसे फुगवून त्यांच्या प्रेयासिला बोलावतात आणि आपली आराधना करतात म्हणुन आपण पडतो, की एखादी आजी देव पाण्यात बुडवून बसते म्हणुन आपण पडतो..."
"अरे तुला काय खूळ लागल का? आपण पडतो त्याच्याशी यापैकी कशाचाही संबंध नाही.निसर्गचक्र म्हणुन पडतो आपण."
"चूक!"
"हे बघ, आपण पडतो त्याला उगाचच काहीतरी महान अर्थ चिकटवत पडू नकोस."
 

"पण, समज आपण स्वताचा असा समज करुन घेतला, की आपण त्या बेडकांसाठीच पडतो आणि आपल्या वर्षावात भिजुन बेडूक-बेडकी प्रनयात धुंद होतात......मादी अंडी देते.हजारो बेडूक जन्मतात, ते किड्यांना  खाऊन पृथ्वी स्वच्छ ठेवतात. त्या बेडकांना खाऊन साप जगतात..."
"बापरे, मी हा असा विचारच केला नव्हता कधी..."
 

"समज, कुणीतरी पर्जन्यदैन्य  होता म्हणुन आपण पडलो.पाउस पडून काही कोणाचा व्यक्तिगत फायदा नाही.मग यांच्यामुळे आपण पडलो, अस समजायला काय हरकत आहे?"
"खरच, काहीच हरकत नाही आणि एखादी प्रेमळ आजी जगासाठी देवाला पाण्यात बुडवून ठेवणार असेल, तर तेवढ्यासाठीच मी पडतो म्हणायला तर मला आनंदच वाटेल!"
 

"आता कस बोललास? नाही तरी आपण पडणार तर आहोच,मग त्या पडण्याला असा अर्थ दिला तर पडण्याला आणखी गम्मत नाही का येणार? आता आणखी एक गम्मत.तुला जर choice दिला आणि विचारल, की बोल तुला कुठे पडायचे  आहे, तर तू कुठे पडशील?"
"हे काय भलतच?"

 
 
"अरे गम्मत! ज़रा विचार तर करुन बघ.कुठेतरी दोन धुंद जीव एकमेकांना लगटून समुद्राकाठी फिरत असतील तर नेमक जाउन तिच्या ओठांवर पड़ाव,भेगाळलेली जमीन तहानेन व्याकुळ  होउन आकाशाकडे पाहत असते तिच्या तृप्तीचा  पहिला थेम्ब व्हाव,एखाद अवखळ मूल खिडकित बसून तळहात गजातुन बाहेर काढत असेल तर त्याच्या इवल्या हातांवर जाउन विसावाव.....एखाद नक्षिदार फुल पाखरू पंख पसरून फुलावर बसल असेल तर त्याचे रंग भिजवून टाकावेत...काहीही!" दूसरा थेम्ब ऐकता ऐकता हरखून गेला होता.पहिल्यान बोलन संपवल तेव्हा तो  भानावर आला आणि म्हणाला,"अरे आपले  आयुष्य  पण एवढे रोमांटिक,छान असू शकत, असा विचारच नव्हता केला मी कधी!"
 
 
एक आजोबा हातात पिशवी सांभाळत, वाऱ्याने उलटी होत असलेली छत्री सावरत कसेबसे चालत होते.पहिला थेंब त्यांच्या छत्रीवर पडला आणि मग घरंगळत जमिनीवर पडला.चाफ्याच डौलदार झाड़ दुधाळ फुल अंगावर लेवून हिरवी वस्त्र नेसून सजल होत.भार सहन न होउन पान वाकल आणि थेंबन जमिनीवर उडी घेतली.तितक्यात पहिल्यान दुसर्याला मिठीत झेलल.दूसरा म्हणाला,"आता मी वाट बघतोय, वाफ होउन ढगात जाण्याची आणि पुन्हा थेम्ब होउन बरसन्याची.थेम्ब होउन पडण्यात किती मजा असते, ते मला आज कळल!".
 

सुनील भूमकर 

संस्कृती

sansk-logo-final.jpg































|



शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी…
वांग्याचे भरीत.. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी.
केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ…
मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी…


दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार..
दिव्या दिव्यादिपत्कार… आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी…
मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी…
दस-याला वाटायची आपट्याची पाने…
पंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे…
सिंहगडावर भरुन आलेली छाती आणी दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श…

कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्र्श्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो.कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा….


पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो
जीवन त्यांना कळले हो…
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणे गळले हो
जीवन त्यांना कळले हो….

{पु.ल. देशपांडे}









Sunday, March 20, 2011

काही जागतिक सत्ये

१ . ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळ घेतो!

१ ) पेन: दुसरयाकडून घेवून परत न करण्याची वस्तू
२) बाग: भेळ शेवपूरी वगॆरे खाऊन कचरा टाकण्याची जागा
३) चवकशीची खिडकी: 'इथला माणूस कोठे भेटेल हो' अशी चवकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक चवकोनी जागा.
४)ग्रंथपाल: वाचकाने मागितलेले पुस्तक 'बाहेर गेले आहे' असे तंबाखू चघळत तिराकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.
५) विद्यार्थी: आपल्या शिक्शकांना काहीही dyaan नाही असे मानून आत्मकेंद्रीत राहणारा एक जीव
६) कार्यालय: घरगुती ताणतणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा
७) जांभई: विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी
८) शब्दकोश: जिथे 'लग्ना'आधी 'घटस्फोट' होतो असे स्थ्ळ
९) प्रेमप्रकरण: क्रिकेट सारखाच एक खेळ. जिथे पाच दिवसांच्या 'कसोटी'पेक्शा झटपट 'सामने' अधिक लोकप्रिय असतात
१०) सिगारेट: वाळका पाला भरलेली एक सुर नळी जिच्या एका टोकाला आग दुसरया टोकाला मुर्ख माणूस
११) कपबशी: नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू

१२) कॉलेज : शाळा व लग्न यामधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण





मुली लग्न का करतात............ . .....?

1) एकातरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी........

2) गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणून......

3) जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणूक म्हणून.........

4) पुरूष किती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी............ .....

5) आई-बापावर दया करण्यासाठी.......

6) मैत्रिणीने केले मग मी का नको ...........?

7) नवीन-नवीन डिज़ाइनची मंगळसूत्रे घालवयास मिळावी म्हणून..........

8) नवराच्या जिवावर मुलांची हौस भागवता यावी म्हणून............ ......

9) मुक्त होण्यासाठी लग्नच केले नाही तर मुक्ती कोनापासून मिळविणार............ ....

10) आपल्या पाक कृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्या वर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा बकरा मिळण्यासाठी............ . .

11) लग्नानंतर मुली उजळतात म्हणे............ फअरनेस क्रीम फासून फासून थकल्यावर 

शेवटचा एक जालिंम उपाय म्हणून,,,,,,






Tuesday, March 15, 2011

रजनी पुराण

 ||रजनी कांताय नमः||
अर्थात फक्त रजनीकांत हे एकच सत्य बाकी सब झुठ   गणपतीच्या घरी 10 दिवस रजनीकांतची स्थापना केली जाते.
संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत. टोकन मनी म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल.
एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात.

अशोक चव्हाणांना का जावे लागले?

ते हल्ली ब-याच भाषणांमध्ये जाहीरपणे म्हणाले होते, ‘रजनी कान्ट!’
एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा करेल?

रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला.

एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं म्हणे!

रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला, दुपारी त्याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली.. बिना पासपोर्ट-व्हिसा

अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल.
एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं, ‘‘उगाच थरथर कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात. रजनीकांत वजनीकांत जगात काहीही नसतं!’’

एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला.. शेवटी सूर्याचीच पापणी लवली.

‘रोबो’ सिनेमा हिट झाला, तेव्हा रजनीकांतने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला चार स्टारचे रेटिंग दिले.

देवाला जेव्हा जेव्हा मानसिक धक्का बसतो, तेव्हा तो ‘अरे रजनीकांता’ असे उद्गारतो.

रजनीकांत घडय़ाळ घालत नाही. कोणत्याही वेळी किती वाजलेत, हे तोच ठरवतो.

त्सुनामी कशा तयार होतात..

अर्थातच, समुद्राच्या पोटात भूकंप झाल्यामुळे...., प्रत्येक गोष्ट रजनीकांत करेल की काय?
लहानपणी रजनीकांतची खेळणी एकदा हरवली.. ती जागा आज ‘एस्सेलवर्ल्ड’ म्हणून प्रसिद्ध आहे.

न्यायदेवतेने एकदा रजनीकांतकडे क्रुद्ध नजरेने रोखून पाहिले होते.. ती आजतागायत आंधळी आहे.

रजनीकांत खिडकी उघडी ठेवून एसी चालू करतो, तेव्हा देशात हिवाळा सुरू होतो.

रजनीकांतशी गप्पा मारताना.. राज ठाकरेही तामिळ बोलतात.
 
करता.. तो एका तासात एक कोटी माणसांपर्यंत पोहोचत

इजिप्तमधील पिरॅमिड हे खरेतर रजनीकांतचे चौथीतले भूगोलाचे प्रोजेक्ट्स आहेत.

रजनीकांतचा फोन व्हायब्रेटर मोडवर असला, तरी कोयना धरणाला धोका नाही.

-कार्यकारी अभियंता, कोयना धरण विभाग
मुंबईतली वीज कधी कधी अचानक थोडय़ा वेळासाठी गायब होते.. कारण, तेव्हा रजनीकांतने आपला फोन चार्जिगला लावलेला असतो.

रजनीकांतने एक दिवस शाळेला बुट्टी मारली.. शाळेने तो दिवस रविवार असल्याचे जाहीर करून टाकले.

रजनीकांतला एकदा एका रिपोर्टरने विचारले, ‘‘मोबाइल आणि इंटरनेटवर फिरणाऱ्या रजनीकांत जोक्सविषयी तुझं मत काय?’’ रजनीकांतने गंभीरपणे प्रतिप्रश्न केला, ‘‘तुला खरंच वाटतं की ते काल्पनिक विनोद आहेत म्हणून?’’

संता-बंता आत्महत्या करणार आहेत. रजनीकांतमुळे आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता. रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो डाव हरला.. का?

कारण त्या मुलाकडे तीन रजनीकांत होते.
रजनीकांतच्या घरी मादाम तुसॉचा मेणाचा पुतळा आहे.

प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते, ते परतच केले नाहीत.. तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.

एकदा एका ट्रेनची सायकलशी टक्कर झाली आणि ट्रेन रुळावरून घसरली.. सायकलचालक रजनीकांत फरारी झाला आहे.

रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले.. भारतात बसून, ब्लूटुथवरून.

एकदा रजनीकांतच्या आईने ओरडून सांगितले.‘‘बेटा रजनीकांत आपल्या सोलर वॉटर हीटरमधून गार पाणी येतंय रे,’’ रजनीकांत तडक छतावर गेला आणि सूर्य दुरुस्त करून आला.

रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ‘‘मला सतत अशी भावना होते की कुणीतरी माझा पाठलाग करतंय.’’ दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ‘‘माय गॉड, माझी सावली कुठे गेली?’’

प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’

मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता उत्तम वकील म्हणून नाव कमावायचंय. भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करून नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.’’
प्रोफेसर म्हणाले, ‘बाप रे, तुझं नाव काय?’’
‘‘सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.’’
‘‘आई आई, तो बघ तारा तुटला!’’ ‘‘नाही रे बाळा, आजकाल काही भरवसा नाही. रजनीकांतने एखादा दगड फेकून मारला असेल सूर्याला नाहीतर चंद्राला!’’

एकदा एका माणसाने रजनीकांतच्या प्रेयसीची छेड काढली.. आज जग त्याला बॉबी डार्लिग या नावाने ओळखते.

एकदा रजनीकांत पावसात क्रिकेट खेळत होता.. त्या दिवशी खेळामुळे पाऊस थांबवण्यात आला.

एकदा रजनीकांतने दोन हत्ती, दोन ऊंट, दोन घोडे पाळले आणि लष्कराकडून काही सैनिक मागवून घेतले.. त्याला बुद्धिबळ खेळण्याची हुक्की आली होती.

एकदा जेम्स बाँडने एका माणसावर गोळी झाडली आणि तो म्हणाला,

‘‘आय अ‍ॅम बाँड, जेम्स बाँड.’’
त्या माणसाने ती गोळी हातात झेलली आणि बाँडवर फेकून मारली. बाँड जागीच गतप्राण झाला, तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘आय अ‍ॅम कांत, रजनीकांत. येन्ना रास्कला.’’
एकदा एका माणसाने जळती सिगारेट हवेत भिरकावली. ती एका ग्रहावर जाऊन पडली. तो ग्रह धडाडून पेटला.. त्यालाच आता आपण सूर्य म्हणतो.. सिगारेट फेकणा-या माणसाचं नाव सांगायलाच हवं का?

एकदा रजनीकांतने संतापून झाडू मारणा-या एका पो-याला लाथ मारली.. तो झाडूसह आकाशात फेकला गेला.. आज लोक एकदा रजनीकांत कपातून चहा पीत होता. तो त्याला जरा जास्त झाला.त्याने हातातल्या सुरीने चहा अर्धा कापला.. तीच जगातली पहिली ‘कटिंग चाय’ होती.

हृतिक रोशनने रजनीकांतशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला.... ‘गुजारिश’मध्ये. बिचा-यावर संपूर्ण सिनेमाभर व्हीलचेअरमध्ये बसून राहण्याची पाळी आली.

एकदा रजनीकांतने अलका कुबलला एक तास हसवले!!!

रॉजर फेडरर म्हणाला, ‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’

रजनीकांतने विचारलं, ‘‘नेटमध्ये भोकं किती असतात?’’
ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?....प्रकाशाचा.

तुम्ही ‘रजनीकांत’ असं उत्तर देणार होतात, हो ना?
पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही.
दिवाळीत रजनीकांत फटाक्याने उदबत्ती पेटवतो.

रजनीकांत कॉलेजात शिकत होता तेव्हा प्रोफेसरच लेक्चर बंक करायचे.

कांद्याच्या किंमती इतक्या भडकल्यात की आता रजनीकांतनेही जैन व्हायचं ठरवलंय.

एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक जागीच गतप्राण झाला.. रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता, ‘ढिशक्यांव!!!!’

सुपरमॅन आणि रजनीकांत यांनी एकदा एकमेकांशी पैज लावली होती.. जो पैज हरेल, त्याने उरलेल्या संपूर्ण आयुष्यात अंडरवेअर बाहेरच्या कपडय़ांच्या वर घालायची असं ठरलं होतं..

‘मिशन इम्पॉसिबल’ हा सिनेमा टॉम क्रूझच्या आधी रजनीकांतलाच ऑफर झाला होता.. रजनीकांतने तो नाकारला.. सिनेमाचं शीर्षक त्याला फारच अवमानकारक वाटलं म्हणे!

एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?..ट्रॅफिक हवालदार..

सगळय़ा गोष्टी रजनीकांतच करू शकतो की काय?

रजनीकांतने एकदा आत्मचरित्र लिहिले.. त्यालाच आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या नावाने ओळखतो.

नव्या वर्षाची भेट फेकिया कंपनीचा नवीन रजनी सिरीजचा ताकदवान आर-११ मोबाइल जो एकावेळी
10 सिमकार्ड सामावून घेणारा

500 जीबी मेमरी

320 मेगापिक्सल कॅमेरा
शिवाय टीव्ही, फ्रिज,
एसी आणि कार.. एकाच मोबाइलमध्ये
२०१२ सालापर्यंत जगभरातील लोक कम्प्यूटरमध्ये अतिशय ताकदवान हार्डडिस्क वापरू लागतील.. जिची क्षमता मेगा बाइट्स, किलोबाइट्स किंवा गिगाबाइट्समध्ये नव्हे,

तर रजनीबाइट्समध्ये मोजली जाईल.
आदर्श सोसायटीच्या बद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधींना काय स्पष्टीकरण दिले?..

‘‘ती इमारत सहाच मजल्यांची होती मॅडम. रजनीकांतने खेचून 31 मजल्यांची केली!!!’
चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?..

कारण, दक्षिणेला रजनीकांत आहे!!!
रजनीकांतचा जन्म 30 फेब्रुवारी रोजी झाला.. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याने ती तारीख कोणालाही दिली नाही.

रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी एक खास टूथ पावडर वापरली..तिलाच आपण आज

‘अंबुजा सिमेंट’ म्हणून ओळखतो.
रजनीकांत जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात आला होता,

तेव्हा त्याला विचारण्याच्या योग्यतेचा प्रश्न विचारण्यासाठी कम्प्यूटरला हेल्पलाइनची मदत घ्यावी लागली होती.
गॅलिलिओने दिव्याखाली अभ्यास केला.

ग्रॅहॅम बेलने अभ्यासासाठी मेणबत्ती वापरली.
शेक्सपीयरने रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास केला,
हे सर्वानाच ठाऊक आहे.
रजनीकांत मात्र केवळ उदबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करून शिकला, हे
फारसं कोणाला माहिती नाही.
तेव्हा मित्रानो मानवतेवर उपकार करा आणि रजनीकांतच्या नावाने वेडेवाकडे विनोद पाठवू नका नाहीतर एखाद दिवशी ईनटरनेटच डिलीट करून टाकेल 
 

Saturday, March 12, 2011

काही अपरिहार्य जोड्या

पण तरीही जोड्याच,,,,,,,,


भांडल्या शिवाय जेवण जात नाही ज्यांना
त्या दोघी म्हणजे .....सासु आणि सुना

ईच्छा नसतानाही चेहरे एकमेकां समोर ठेवतात हसरे
ते दोघं म्हणजे .....जावई आणि सासरे

एकमेकिंच्या पराभवातच मानतात आपला
त्या दोघी म्हणजे .....नणंद आणि भावजय

एकाच घरातराहुनही गॅस मात्रवेगळा हवा
त्यादोघीम्हणजे .....जावाजावा

बोलणं असतं कमी पण भांडायला असतात अधी
ते दोघं म्हणजे .....वहिणी आणि दीर

या सा-या नात्यांमुळे ज्या समस्या निर्माण होतात
त्या समस्या जे सामंजस्याने हाताळता
ते दोघं म्हणजे .....यशस्वीपतीपत्नी

Friday, January 7, 2011

का ग तु अशी वागतेस गं....

तुला पाहिलं कि हृदयाची घंटा वाजते.
तुझि उपस्थिति अख्ख्या जगाचं सुख देउन जाते.
तुझ्या बरोबर जगलेले दिवस,
आयुष्याला खुप आठ्वणी देउन जातात.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ..

तुला पाहिलं कि स्वतःला विसरतो,
तुला पाहिलं कि स्वतःला हरवतो,
तुला पाहिलं कि जगच ठेंगन वाटत.
तु प्रत्येक गोष्ट किति सहजतेने समजुन घेतेस ग.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ग.

तुला खुप जाणावस वाटत,
तुला खुप ऒळ्खावस वाटत,
सारख तुझ्या सानिध्यात रहावस वाटत.
सर्वात मिसळून जाण्याचि तुझि ति अदा.........
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ग.

तुझा तो अबोलेपणा, निरागसते चा प्रितिपणा,
मला तुझ वेड लाउन जात.... वेड....
आनंद व्यक्त करणारि तुझी अदा,
जगण्याला महत्व देउन जाते.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ग.

तुझ हसणं, तुझ रुसण,
माझ्या आयुष्याला जणू ऊद्देश देउन जातं.
आयुष्यात जणू तुझीच गरज होती,
अस्सं वाटायला लागतं
तुझा विचार जरी मनात आला ना........
तरी गालावर एक गोड्सं हसु देउन जातं.
मग पुन्हा पुन्हा विचारवसं वाटत ग....
का ग तु अशी वागतेस गं....
का ग तु अशी वागतेस गं....

Thursday, January 6, 2011

पुण्याहून पत्र

नकार देणे ही कला असेल.. पण, होकार देऊन काहीच करणे , ही त्याहून मोठी कला आहे.


************ ********* ********* ********* ********* ********* *********
जसा मच्छर मारून तू
शिकारी बनणार नाहीस
तसाच १०-१२ एसेमेस फॉरवर्ड केल्याने तू भिकारी बनणार नाहीस

------------ --------- --------- --------- --------- --------- --------- --------- ---------
तू झाडावर चढू शकतोस का ? संजीवनी आणू शकतोस का ? छाती फाडून राम-सीता दाखवू शकतोस का? नाही ना?
... अरे वेड्या , फक्त माकडासारखं तोंड असल्यानं कुणी हनुमान होत नाही!!!!

************ ********* ********* ********* ********* ********* *********
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात. तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात. एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो... ... का?
..अंगात मस्ती , दुसरं काय ?
************ ********* ********* ********* ********* ********* *********
जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते ,
असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का ?

जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!
************ ********* ********* ********* ********* ********* *********
हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं!!!
************ ********* ********* ********* ********* ********* ********* ********* *********
प्रश्न् : चीनची लोकसंख्या ओलांडून भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरला, तर त्याचे वर्णन फक्त दोन शब्दांत कसे कराल ? उत्तर : चीनी कम!!!!
************ ********* ********* ********* ********* ********* ********* *
तुफान पाऊस पडतोय...
तुला वाटत असेल
छान बाहेर पडावं
भिजून चिंब होत
पाणी उडवत
गाणं गाताना
कुणीतरी खास भेटावं... हो ना? अरे, हो म्हण ना, लाजायचं काय त्यात? प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!
************ ********* ********* ********* ********* ********* *********
ट्रिंग ट्रिंग

हॅलो

हॅलो, प्रकाश आहे का?
नाही.
मग खिडकी उघडा , प्रकाश येईल.
************ ********* ********* ********* ********* ********* *********
'' सर, तुम्ही मला शून्य मार्क दिलेत या पेपरात. हे मला बिलकुल मान्य नाहीये,'' ढब्बू ढगोळे तणतणत म्हणाला... '' अरे, ढब्बू, तुलाच काय, मलाही मान्य नाहीत हे मार्क,'' खंडेराव खत्रूड सर म्हणाले, '' पण, शून्यापेक्षा कमी मार्क देताच येत नाहीत ना रे!!!!''
************ ********* ********* ********* ********* ********* *********
पुण्याहून पत्र

प्रिय बाबा, शि. सा. . वि. वि. मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप पोहोचलो. इथे बऱ्याच गंमती पाहायला मिळत आहेत. पुणेकरांचं जुनं वाहन म्हणजे सायकल. आपल्या गावात जसे देवाला सोडलेल्या रेड्याला काही करत नाहीत , तसंच इथे सायकलस्वारांना कोणतेही नियम लागू नाहीत.
इथलं सध्याचं वाहन म्हणजे बाइक. त्यांना इंधनबचतीचं महत्त्व खूपच पटलं आहे. त्यामुळे ते दुचाकीवर तीनजण बसतात.
सिग्नलपाशी लाल दिवा असला , तरी सहसा थांबत नाहीत. त्यामुळे पेट्रोल जास्त जळते ना.
वळताना हात दाखवायचा , तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे! म्हणून हात दाखवण्याचे कष्ट कुणी घेत नाही.
हात दाखवून अवलक्षण व्हायला नको म्हणून रिक्षावाले तर पायानं वळण्याचा इशारा करतात.
इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात. आहे ना गंमत ? अशाच काही गंमती पुढच्या पत्रात.

तुमचा लाडका.
सुनील