Wednesday, September 12, 2018

*वजन कमी करण्यासाठी मोहरी (राई)*

 पुरातन काळापासून आपल्या भारतीय संस्कृतींत *मोहरी (राई)* ला अतिशय महत्व आहे. अनेक आजारांवर रामबाण उपाय असलेली *मोहरी (राई)* विषयी नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून हे सिध्द झाले आहे की वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा, सरळ, कोणतेही साईड इफेक्ट नसलेला उपचार म्हणजे *मोहरी (राई)* .
उपचार पध्धत खालील प्रमाणे आहे:
*जिन्नस*:
एक किलो उत्तम दर्जाची *मोहरी (राई)*
एक स्टिल किंवा काचेचे पात्र ( ज्या मध्ये एक किलो मोहरी राहू शकेल)
एक लिटर पाणी
१० फुट बाय १० फुट रिकामी जागा

पध्धत:
मोहरी(राई) भरेलेल पात्र उजव्या हातात घ्या व १० फुट बाय १० फुट रिकाम्या जागेत सर्व मोहरी(राई) भिरकवा / पसरवा.
दोन पावलं एकमेकांपासून साधारण १ ते २ फूट दूर ठेवा आणि मग कमरेतून वाकून
मोहरी(राई) चा एक एक दाणा जमिनीवरून उचलून भांड्यात टाका. काम पूर्ण झाल्यावरच भांड्याचे वजन करा. भांड्यातील मोहरीचे(राईचे) वजन तेव्हढेच आढळल्यास खात्रीशिर पणे सांगू इच्छितो की तुमचे वजन नक्की तिप्पटीने कमी झाले असेल.
वरील प्रकार केल्याने दुसरे कोणतेही उपासतापास, कोणत्याही पावडरी घेण्याची जरूर नाही. बांधा सुडौल होईल व एकदम ताजेतवाने वाटेल.

ता.क.:
👉१ लिटर पाणी चक्कर वगैरे आल्यास पिण्या साठी आहे.

👉झिरो फिगर त्वरीत करायची असल्यास मोहरी(राई) ऐवजी खसखस वापरा.

पुणेकर आयुर्वेदाचार्य
स्वामी सुनीलानंद🤑🤑

Monday, August 20, 2018

देवा रवळनाथा, माझी एक तक्रार आसा

देवा रवळनाथा !!!

................
वाडीच्या पोष्टात एक पत्र येता,
सॉरटिंग करताना पोस्टमन पत्तो बघता तर...
 "श्री देव रवळनाथ, मु.पो. स्वर्ग"
सगळे हसतत,

गंमत म्हणान पोस्टमन पुढचा वाचता.....

 "देवा रवळनाथा, बाबीच्या आयेचो नमस्कार. बाबी बायलेक घेवन मुंबैक गेलो तेवा पासून एक पैसो पाठवल्यान नाय तीन म्हयन्यात, माझी अगदीच इटमणा झाली रे देवा, माझ्या पोटा पाणयाचा काय करू? गेले दोन दिवस नुसती पेज आणि तोराची चटणी खावन काढलंय. काल मिरगाच्या दिवसाक सगळी कोंबडी सुदा चोरयेक गेली. काळू गाय लोकाचो तरवो खावन आपलो दिवस काढता. पण असा आणि किती दिवस चलताला? तेवा कायतरी सोय कर लवकर. वाट बगतंय."

सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येता. पोष्टाचे लोक कदी नाय ती सोमती वरगणी काढतत. ९० रुपये जमा जातत. पोस्टमन बाबीच्या आयेक नेवन दिता.

रवळनाथ पावलो !! आणि सोमती मनीऑर्डर केल्यान बाबीच्या आयेक वायचं बारा दिसता.

दोन दिवसांनी परत बाबीच्या आयेचा एक पत्र पोष्टात येता.
पोस्टमन वाचूक सुरवात करता .....

"देवा रवळनाथा, पावलस रे बाबा अडीअडचणीक, पैशे पोचले. पण माझी एक तक्रार आसा. माका म्हायती आसा तू १०० रुपये पाठवल आसतंलस ते. पण पोष्टातल्या लोकांनी माका ९० रुपयेच दिले आणि १० आपण खाल्यानी. चोर मेले. वाटोळा कर मेल्यांचा."